English

Achievements

Pragati 0 to 1

Achievements of Alan Turing... (1)

हे friends,

दिवाळी आणि फराळ संपून थोडेच दिवस झालेत आणि शाळाही सुरु झाली. 
आज शाळेचा पहिला दिवस. 😇😇 कसा दिसतोय मी, झकास ना... 

अरे हो माझ्या शाळेचे नाव सांगायचेच राहिले. माझ्या शाळेचे नाव आहे ९ - १३ - १ - ७ - ९ - १४ - १ - १८ - २५ - स्कूल .😒😕 ओ  confused. काही नाही फक्त इंग्लिश बाराखडीतले त्या क्रमांकाचे अक्षर घ्या आणि बूम.. 
९-१३-१-७-९-१४-१-१८-२५-Y म्हणजे, Imaginary School. असे नाव आमच्या Principle सरांनी ठेवले आहे. त्यांना unick गोष्टी करण्याची आवड आहे. आणि त्यामुळे इथे सगळेच युनिक आहे.
Imagination is Everything.Its the preview of life's coming attraction. 
Albert Einstein
आमच्या शाळेमध्ये शिकवताना Imagination वर जास्त भर दिला जातो. Imagination हेच सर्व काही आहे.
आज शाळेचा पहिला दिवस आणि मी वर्गात बसून हे Imagine करत आहे कि, मी एका अमर्याद क्षमता असलेल्या, प्रगतिशील व्यक्तीसोबत संवाद साधत आहे. ओह शांत बसा आमचे सर आले वर्गात , अरे पण मी तर imagine करतो आहे ना. कोणाला ऐकू जाणार नाही आपल्याशिवाय.

सरांनी हा काय इतका मोठा बॉक्स आणला आणि ... सर हे काय करत आहेत. हवेत हात हलवत आहे. आणि त्यांच्या हातात खडू आहे. अरे हो सर हवेत काहीतरी लिहीत आहेत. 

ओह्ह सरांनी Have A Imaginary Day. असं लिहिलंय. आणि ते कोणीच खोडू  शकत नाही कारण ते दिसताच नाही.😁😂😂
बरोबर आहे, दररोज तेच ते बोर झालो होतो. Goooood Moorrnning.Good Afternoon, Good Day.  हे काहीतरी युनिक आहे.

तर मी सरांकडे लक्ष देतो आणि तास संपल्यावर तुम्हाला सांगतो नेमक सरांनी काय सांगितलं तोपर्यंत हा सुविचार...एन्जॉय करा 


ज्ञान का सारा रहस्य एकाग्रता है .......      स्वामी विवेकानंद

सरानी आज आम्हाला आमचे परीक्षेचे पेपर वाटले.  मला त्यात ४मार्क्स आहेत. 😕😒😖 confusion. Hexadecimal मार्क्स आहेत. म्हणजे ७९ मार्क्स आहेत मला.

वर्गातला टॉपर ९५ मार्क्स चा आहे. काही जन खूप निराश होते आज. कारण त्यांना त्यांच्या मित्रापेक्षा कमी मार्क्स मिळाले होते. काही तर येडेच असतात. एक तर ९१ मार्क्स मिळूनही रडत होता.

सरानी तर मग हद्दच केली सगळ्यांनाच १०० मार्क्स देऊन टाकले. आणि विचारल आता कस वाटतंय. कोण इथे करोडपती झालाय लवकर सांगा. सगळेच १० मिनिट चूप होते . 
 
मग सरानी सांगितलं बोलायला सुरुवात केली कि,  "तुम्हाला आयुष्यात ज्यांच्यासोबत competition करायची आहे तो या बॉक्स मध्ये मी धरून आणलाय." सगळ्यांना बघायचंय ना ? " मग काय सगळेच उत्सुक होते, कि सरानी कोणाला धरून आणले आहे बॉक्स मध्ये. आणि सर असे काम कधीपासून करायला लागले 😜😜. 

सरानी बॉक्स उघडला आणि एका एका मुलाला बोलावले व त्यामध्ये डोकावून बघायला सांगितले. मी वर्गात शेवटी बसतो कारण तिथून सगळेच दिसतात. म्हंजे मित्र फक्त..😜

एक एक करून प्रत्येक जण कुतूहलाने उठत होता आणि बॉक्स मध्ये डोकावून बघत होता. पण बघितल्यावर मात्र त्यांचे समाधान होत होते. (असे कोण आहे कि ज्यांच्यासोबत मला आयुष्यात स्पर्धा करायची आहे .??...)  आणि 

मी हि उठलो बघितले तर काय त्यात एक आरसा होता. आणि आरशात मी. 

एकदम वीज चमकल्यासारखे झाले. आयुष्यात स्पर्धा जर कोणासोबत करायची असेल तर ती म्हणजे स्वतःसोबत. मी एका ठिकाणी ऐकले होते  जर आपण दररोज एक टक्का हि improve झालो तर वर्षाच्या शेवटी आपण ३६५ टक्क्यांनी improved असू. झकास आहे ना. 

दररोज एक percent improvement फक्त.

सरांनी आम्हाला एक secret प्रश्न दिला आणि एक प्रोजेक्ट.
प्रोजेक्ट : आम्हाला आमच्या मनाप्रमाणे कोणत्याही शास्त्रज्ञाची माहिती एका गोष्टीच्या स्वरूपात सांगायची आहे. तो mathematician किंवा physicist किंवा इतर कोणीही. चार दिवसात आम्हाला हि गोष्ट बनवायची आहे.
आणि प्रश्न आहे. २३hat  s   १३-५ant   b२५   lie ?
तर आता आपणही प्रयत्न करून शकता. प्रश्नही शोधायचा आहे आणि मग उत्तरही. too much fun..... 

to be continued... 


Imaginer.....
Shivam Chapule..