English

Career Talk

Pragati 0 to 1

ध्येयाबद्दल बोलू काही ..

मित्रांनो,
तुम्ही ध्येय तर लिहिले असेल, लिहिले ना ?....  लिहिले असेल तर एकदमच झकास आहे कारण हि सुरुवात आहे आणि कोणीतरी म्हणूनच ठेवले कि,
Good Start is half Done.  
अशा स्टार्ट नन्तर आपल्याला ध्येयाच्या तयारीचा शक्य तितका स्पष्ट आराखडा बनवायचा आहे.
Greatness start with Clear Vision.                                                                       -Simon Sinek
आणि मग एकानंतर एक अशी तयारी आपल्याला करायची आहे.
Preparation is key to Success                                       -Alexander Graham Bell
या तयारी दरम्यान आपल्याला अडचणींचा सामना करावा लागणार
दिवसभरात एकही अडचण आली नाही तर समजा तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. 
-स्वामी विवेकानंद 
या अडचणी म्हणजे एक प्रकारे संधीच आहे. स्वतः च्या क्षमता वाढवण्याच्या. गरज आहे त्या ओळखण्याची.
आजवर जे महान लोक किंवा उद्योग झालेत किंवा आहेत ते फक्त या गोष्टीमुळे कि त्यांनी सर्वात जास्त अडचणींचा सामना केला आणि त्यातून स्वतःचा विकास साधला.

या सर्व प्रवासात हेही निश्चित्त आहे कि आपण ठरवल्यानुसार सगळ्या गोष्टी होणार नाहीत. म्हणजे त्या त्या वेळची परिस्थिती, तंत्रज्ञान यामुळे प्रचंड बदलाला आपणाला सामोरे जावे लागणार. अशा परिस्थितीतही आपल्याला जागृत राहून संधी शोधाव्या लागतील.


तर अपना सर्वाना अशा प्रगतिशील यशासाठी शुभेच्छा. 
HAPPY PROGRESS

ध्येय ठरवताना स्वतःला विचारायची काही प्रश्न (3)

मित्रांनो,

आपल्याला आवडणारी कामे आणि ती करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये या सगळ्या गोष्टी सविस्तर लिहायच्या आहेत.

Compare your strength
आता हि लिहिलेली आवश्यक कौशल्ये आणि आपली क्षमता यांची तुलना करायची आहे. आणि आपल्याला या कौशल्यांना एक एक क्रमांक द्यायचा. जो कि  १ ते १० च्या दरम्यान असेल. म्हणजे आपल्याला जर असे एखादे कौशल्य जमते असे वाटत असेल तर आपण त्याला १० असा क्रमांक द्यायचा आणि नसेल जमत तर १. याप्रमाणे अंक निवडायचा आणि तो लिहायचा आहे.

उदा. इंजिनिअर साठी गणित आवश्यक असते. तर आपल्याला तपासायचे आहे कि आपल्याला गणित कितपत जमते. जर पूर्ण जमत असेल तर १० आणि अवघड जात असेल तर त्यानुसार अंक लिहायचा आहे.
The joy of the mind is the measure of its strength 
Ninon de Lenclos 

यामुळे असा गैरसमज करायचे कारण नाही कि, आपण हुशार नाही.प्रत्येकाचे काहीनाही शक्तिस्थान असतात. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी जमत नसतात. त्यामुळे आपल्याला आपल्यानुसार होईल तितका सर्वांगीण विचार करायचा आहे.

हे झाल्यानंतर वर्तमान स्थितीत आपल्या आवडींना किती संधी आहेत. आणि भविष्यात किती संधी असू शकतात याचे आकलन करायचे आहे. व पुन्हा एक दुसरा क्रमांक द्यायचा आहे. जो या संधी साठी असेल. जर संधी भरपूर असेल तर १० कमी असेल तर ५.

आता तयार झालेल्या या सर्व माहितीचे आकलन करायचे आहे. ज्या गोष्टी किंवा कौशल्यात आपली क्षमता १० आहे आणि संधी हि १० आहे. त्यावर शिक्कामोर्तब केला जाऊ शकतो. त्यासाठीची तयारी सुरु केली जाऊ शकते. या तुमच्या ध्येयाला आता स्पष्ट लिहून घ्या.


जे ध्येय ठरवतात.त्यांना  १०० % यश मिळते.आणि जे ध्येय ठरवून लिहून ठेवतात त्यांना १०००% यश मिळते 

ध्येय ठरवताना स्वतःला विचारायची काही प्रश्न ...(2)...

नमस्कार, काल मी वर्गात मुलांना त्यांच्या आवडी कोणकोणत्या आहेत याची एक यादी बनवायला सांगितली.
आज त्यांना ध्येय ठरवण्यासाठी अजून कोणती प्रश्न आहे ते सांगायचे आहेत. 
खरेतर एखाद्या कामाबद्दल आवड हि खूप असेल ना, तर बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतात. कारण

आवड हि कोणत्याही कामातील समर्पण ठरवणारी एकमेव गोष्ट आहे.


एकदा पूर्ण झोकून एखाद्या क्षेत्रात काही काम करायचे ठरवले कि ते काम होतेच होते. यासाठी अगणित उदाहरणे आहेत. यशस्वी लोकांकडे हीच गुरुकिल्ली असते, कामातील पूर्ण समर्पण. हे समर्पण त्यांना कोणत्याही अडचणी सोडवण्याचे बळ देते.

तशी माझ्यासमोर आज एक अडचण आहे कि करिअर शोधताना अजून कोणते प्रश्न विचारणे गरजेचे आहे. काल तर मी बोलून गेलो पण आज ? काय करू?😏😏

तस मी इंटरनेट वर भरपूर शोधाशोध केली. करिअर निवडताना स्वतःला विचारायची प्रश्न. भरपूर websites शोधल्या, भरपूर video बघितले. TEDx  Talk, Sunder pichai, Larry Smith, विविध बिसिनेसमॅन, खेळाडू, कलाकार.

पण या सर्वामध्ये अखेरीस मला अतिशय तंतोतंत मार्गदर्शन असलेला विडिओ मिळालाच. 

ज्यामध्ये करिअर म्हणजे नेमक काय हे इतर सर्वांपेक्षा खूपच सुंदर रित्या मांडलेले आहे. मला जर कोणी विचारले तर याला १० पैकी १०० गुण देईल.

हे मार्गदर्शन आहे, MKCL चे सर्वेसर्वा श्री विवेक सावंत सरांचे. विडिओ चि लिंक हि या लेखाच्या शेवटी दिलेली आहे.

आज काहीच न सुचल्यामुळे वर्गात मुलांना तेच भाषण छापणार आहे. फक्त ते कोणी आधी बघितलेले नसावे म्हणजे झाले. चला मी करतो प्रयत्न

मुलांनो कसे आहेत सगळे, तयार आहेत ना. आज मी तुम्हाला पुढचे काही प्रश्न सांगणार आहे.
काल आपण काही आवडणाऱ्या कामाची यादी बनवली बरोबर?
आज त्या प्रत्येक आवडीच्या पुढे त्या आवडीसाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ते लिहायचे आहेत.
(मुलं पण कलाकार असतात, म्हणे सर तिथे पुढे लिहायला जागाच नाही.
खर आहे तेजागा मिळत नसते, बनवावी लागते.)

तर तुम्हाला या गोष्टी होईल तितक्या सविस्तर लिहायच्या आहेत. वेळ लागला तरी चालेल एक तास, एक दिवस, एक आठवडा, एक महिना, एक वर्ष. हा वेळ तुमच्या उर्वरित आयुष्याचे बीज आहे. आणि त्यावर जितकी मेहनत तुम्ही कराल. तितकी मधुर फळे तुमच्या आयुष्याच्या वृक्षाला येतील.
या गोष्टी लिहिण्यासाठी तुम्ही त्या त्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींची मदत घ्या. जर ते अवघड असेल तर आज इंटरनेट हा एक पर्याय उपलब्ध आहे.
तर आपल्याला सविस्तर (Details) आकलन करायच आहे. आणि ते लिहायचही आहे.
Details are the difference between Good stuff and Great Stuff.  
Stephen Brewster 


ध्येय ठरवताना स्वतःला विचारायची काही प्रश्न ????

continued from blog 1...Teacher talking with students in class

ध्येय ठरवण्यासाठी, बरीच प्रश्न अनुक्रमे विचारली जातात. पण सर्वात महत्वाचा प्रश्न जो मला वैयक्तिक आवडतो. तो म्हणजे 

What is my work Interests? म्हणजे मला कोणते काम करायला आवडेल ?

तर मुलांनो हा एक प्रश्न आहे. हा अतिशय पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे जो स्वतःपासून सुरु होतो, कि मला काय करायला आवडेल ? माझा रस कोणकोणत्या कामात आहे

बरीच जण काही चुकीच्या विचारसरणीमुळे ढोबळ गोष्टी सांगतात, कि मला डॉक्टर व्हायला आवडेल, इंजिनिअर, CA, कलाकार यापैकी काही किंवा खूपच झाले तर एखाद्याला शिक्षक व्हायलाहि आवडेल. 

पण प्रश्न काय बनायला आवडेल हा नाहीच मुळी. प्रश्न आहे कि,  

आपल्याला काय करायला आवडेल

प्रश्न हा काम किंवा कृतीबद्दल आहे. कोणती कृती किंवा काम करायला आवडेल
म्हणजे  पेशंट तपासायला आवडेल का (Doctor) 
एखादी  वस्तू बनवायला (Engineer) आवडेल का
किंवा आर्थिक अडचणी समजून  सोडवायला (CA) आवडेल का ?, 
कला सादर करायला आवडेल का ?, 
गोष्टींचा सखोल  अभ्यास करायला आवडेल का ? कि जेणेकरून काही नवीन शोध लावता येतील (शास्त्रज्ञ)? किंवा मुलांना शिकवायला आवडेल का (Teacher) ?

याचा विचार आपल्याला असा करायचा आहे कि तेच काम आपल्याला आयुष्यभर करायला आवडेल का ? 
यात आपली आवड पोकळ असायला नको. कारण काही गोष्टी एकदा दोनदा करायला आवडू शकतात, पण त्याच एक हजार ,दहा हजार कितीही वेळा केल्या तरी आपली आवड कमी व्हायला नको. अशा गोष्टी आपल्याला सर्वप्रथम शोधाव्या लागतील. त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात हेही जाणून घ्यावे लागेल. त्यातून  मग आपल्याला व्यावसायिक आवड निवडावी लागेल.

अशा आवडीची यादी सर्वप्रथम आपल्याला बनवावी लागेल . कारण
आवड हि  मेहनतीला चालना देणारी सर्वात पहिली गोष्ट आहे.
आपण एक गोष्ट ऐकलीच असेल कि थॉमस अल्व्हा एडिसन ने एक फिलॅमेंट शोधण्यासाठी दहा हजार वेगवेगळे प्रयोग केले होते. आज या गोष्टीचे गांभीर्याने आकलन करूयात. प्रयोग हा एकदा दोनदा नव्हे दहा वीस नव्हेशंभर दोनशे नव्हेहजार दोन हजार नव्हे तर दहा हजार वेळा केला गेला. दहा हजार अंक नुसते  मोजायचे असेल तरी आपण दहा वेळा विचार करू. त्या शास्त्रज्ञाने तेवढे प्रयोग केले आणि पूर्ण जगाला कलाटणी देणारा एक शोध लावला. अशी आवड आपल्याला शोधावी लागेल कि कितीही वेळा कितीही अडचणी आल्यात तरी आपल्याला कंटाळा यायला नको. तर मुलांनो अशी यादी आज तुम्ही बनवा. पुढच्या भागात जाणून घेऊयात कि दुसरा प्रश्न कोणता आहे कि जो करिअर निवडीचा मार्ग सोपा करेल.  

प्रगतीची पहिली पायरी कोणती ? निश्चित ध्येय . अन मग निश्चित ध्येयाची पहिली पायरी कोणती?

विद्यार्थी : गुरुजी फळ्यावरील खोडलेली अक्षरे कुठे जातात हो ?

नमस्कार,    मी शाळेत,  १० वि च्या वर्गाला भाषा हा विषय शिकवतो.    अरे माफ करा, मी वर्गाला नाही, तर वर्गातील मुलांना शिकवतो.    हो, आता लगेच काही म्हणतील कि, बघा भाषा विषयाचेच शिक्षक चुकतात, तर मग इतरांची काय कथा.   पण काय आहे, कि चूक केल्यामुळेच वर्ग आणि वर्गातील मुले हि वेगळी असतात हे अधोरेखित झाले.    
मुलांमध्येही प्रत्येकाची जागा आणि त्याचे जग वेगळे असते.   
अशा कित्येक जागांची सैर करण्याचा योग मला आला आहे.

या जगात विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यात एक जग.

वर्गात नियमित तासिका सुरु होती. एका ठिकाणी ध्येयाचा संदर्भ आला व त्यांना ध्येयाबद्दल सांगायला सुरुवात केली. यादरम्यान एका विद्यार्थ्याला सहज विचारले,  कि तुझे ध्येय काय आणि त्याने सांगितले कि मला सीए व्हायचेय. ते बोर्डवर लिहून त्याबद्दलचे नियोजन, लागणारी मेहनत अशी माहिती दिली. व "जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका." असे सांगून फळ पुसला. व अचानक त्याच मुलाने हात वर करून मला विचारले कि गुरुजी फळ्यावरील पुसलेली अक्षरे कुठे जातात हो? आणि सगळी मुले हसली. 

कदाचित माझे प्रवचन रटाळ झाले असावे म्हणून त्याने खोडसाळ पनाने हा प्रश्न विचारला. पण नियमित प्रमाणे न रागावता मी सगळ्यांसोबत हसायला लागलो. त्याच मुलाने तासिका संपल्यावर वैयक्तिक येऊन मला विचारले कि सर माझे ध्येय हे माझेच आहे का हो? . मीही थोडा विचलित झालो.पण त्या मुलाची मनस्थिती समजावून घेण्याचे नाटक करत त्याला म्हटलं कि आपण उद्या ठरवू खरंच तुझे ध्येय तुझे आहे का कि ते कुणीही फळ्यावर लिहून पुसून टाकू शकतो.


दुसऱ्या दिवशी त्याच मुलांना एक प्रश्न विचारला कि, अस काय आहे कि जे लहान मुलांना मोठं (विकसित) होण्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं असत. उत्तर फक्त दोन किंवा एका शब्दात पाहिजे. मग काय धुमाकूळच, अशी अशी उत्तरे मिळाली कि माझे प्रश्न विचारण्याचे ध्येय विचलित होण्याची वेळ आली. विकसित होण्यासाठी काय गरजेचे आहे ? तर जेवण , कोणी म्हणे झोप जास्त गरजेची आहे.

काही मुलांनी थोडास वैचारिक होऊन उत्तरे दिली , कि पुस्तक गरजेचे आहे, कोणी म्हणत शाळा, अभ्यास , परीक्षा, शिक्षण इत्यादी.

पण माझा प्रश्न हा प्रश्न नव्हताच मुळी. मी तर त्यांना सांगितले कि अस " काय आहे ? ", कि जे मुलांना लवकर विकसित होण्यासाठी मदत करतात.  म्हणजे.. 

  "काय आहे ?"....     हा प्रश्न लहान मुलांना  एकदा कळाला कि त्यांची माहिती आणि ज्ञानवृद्धी होण्यास सुरुवात होते.

(या प्रश्नाचे )एका शब्दातले उत्तर होते ते म्हणजे "प्रश्न " . लहान मुलांना विकसित होण्यासाठी सगळ्यात जास्त मदत कशाची होत असेल तर ते म्हणजे प्रश्नांची. 

प्रश्न विचारणे हे अति महत्वाचे आहे आणि

जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत विचारत राहणे हे त्याहीपेक्षा जास्त गरजेचे आहे.

जेव्हा हे होईल तेव्हा आपण आपले निहित ध्येय जाणून घेण्यासाठी तयार असू. आता हे योग्य प्रश्न नेमकी कोणते, ते जाणून घेऊयात …..