English

Pragati 0 to 1

Striving for Progress

नमस्कार, या प्रगतीच्या प्रवासात आपले सहर्ष स्वागत आहे.... (yOur nAim)

Welcome

नमस्कार, मंडळी कसे आहात सगळे, मजेत ना, आणि आपला नेहमीच आपुलकीचा प्रश्न प्रगती करताय ना ?, करायलाच पाहिजे, या सर्वांगीण प्रगती साठी आम्ही घेऊन आलोय तुमचा आमचा आवडता प्रवास. प्रगती o ते १. ओह गोंधळलात ना. हे काय आहे? (विचित्र)... तर हे एक मापक/परिमाण (Measurement) आहे, जे Zero to One या पुस्तकातील आहे. ज्याचे लेखक पीटर थील हे आहेत. हे मापक (शून्य ते एक) , कल्पना मोजण्यासाठी वापरले जाते. या जगातील सर्व कल्पना दोनच प्रकारच्या असतात. एक म्हणजे ० to १, (शून्य ते एक) आणि दुसरी म्हणजे १ to n (एक ते अनंत) यामध्ये शून्य म्हणजे अशी कल्पना जी अस्तित्वात नाही आणि शून्यातून ती एक होते म्हणजे साकार होते. पुस्तकात लेखकाने सिद्ध केले कि अशा कल्पना या खूप अद्वितीय यश संपादित करतात. दुसरीकडे एक म्हणजे कल्पना अगोदरच अस्तित्वात आहे. फक्त तिला अजून विकसित करून मांडणे. म्हणजे १ ते अनंत. Graphया सगळ्या कल्पना, त्यांना साकार करणे रातोरात होत नाही हे आपणा सर्वांनाच माहित आहेत. ज्या कोणाला असे अद्वितीय यश संपादन करायचे आहे, ज्यांना मोठी स्वप्न बघण्याची सवय आहे, ज्यांना आयुष्यात खरोखर काहीतरी करून दाखवायचे आहे. आयुष्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. अशा सर्वांसाठी (आमच्यासाठी सुद्धा ) हि एक पर्वणी आहे. हा एक प्रवास आहे. जो आपल्या सगळ्यांना करायचा आहे. या प्रवासात आपल्याला भरपूर गोष्टीची गरज आहे. योग्य मार्गदर्शन, मोठी स्वप्न, अद्वितीय प्रेरणा, ना संपणारा उत्साह, आणि भरपूर काही. अशा सर्व आवश्यक गोष्टींची देवाण घेवाण करण्यासाठी www.pragati०to१.com हे एक माध्यम आहे. या छोट्याशा प्रयत्नाला आपला उस्फुर्त प्रतिसाद मिळेल अशी आशा.

चला तर बोलूयात,

Let's Talkमाहिती तंत्रज्ञान (information technology), मार्गदर्शन (guidance), यश (Achievement), स्रोत (resources), हे या प्रयोगाचे मुख्य स्तंभ आहेत.
१. माहिती तंत्रज्ञान हि आजकाल माणसाची मुख्य गरज होत आहे. सर्व क्षेत्रात या तंत्रज्ञानाची (Computer) गरज आहे. परिणामतः या क्षेत्रात खूप संधी आहेत. परंतु हे क्षेत्र इतरांच्या तुलनेत खूप लवकर विकसित होते. नवीन तंत्रज्ञान लगेच जुन्याची जागा घेते. त्यामुळे या क्षेत्रात सतत अद्ययावत राहणे अतिशय गरजेचे आहे. या क्षेत्रातील अशीच अद्ययावत माहिती व त्याच्या निगडित असलेल्या संधीची चर्चा IT Talk यामध्ये केली जाईल. त्यासाठीची आवश्यक तयारी, त्याची उपलब्धता, त्याचे online आणि offline पुस्तक व स्रोत अशी सविस्तर माहिती देण्याचा प्रयन्त केला जाईल.
२. या विकसनशील काळात, करिअर (Career) हा एक मोठा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांसमोर सध्या आहे. नेमके करिअर म्हणजे काय? ते कोण कोणते आहेत? त्यांची तयारी कशी करायची? अशा वास्तविक प्रश्नांवर सविस्तर उत्तरे यामधून दिले जातील. हि सगळी माहिती वेगवेगळ्या स्रोतातून, संशोधन करून मांडली जाईल.
३. जो यशस्वी लोकांच्या गोष्टी ऐकतो, त्याचे यशस्वी होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. या blog मध्ये विविध क्षेत्रातील महान लोकांच्या कामगिरीबद्दल, यशाबद्दल, त्यांच्या त्या क्षेत्रातील योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. त्यांनी केलेला संघर्ष, मेहनत, आणि त्यातून मिळालेल्या या यशाच्या प्रवासातून आपल्यालाही प्रेरणा मिळेल.
४.पुस्तक हे ज्ञानाचे मुख्य स्रोत आहे. कित्येक यशस्वी व्यक्ती, त्यांच्या यशाचे गुपित, 'वाचन' आहे असे सांगतात. या ब्लॉग मधून अशाच यशस्वी पुस्तकांबद्दल माहिती दिली जाईल.

आपल्याला नक्की काय हवे आहे ? एक व्याख्याता (Lecturer) कि एक Teacher (शिक्षक)?

Teacherहा प्रश्न आजची अडचण व्यक्त करणारा आहे. पण अडचण अशी आहे कि, हा प्रश्नच कोणी विचारत नाही. इथे व्याख्याता म्हंजे अशा शिक्षकांसाठी वापरला कि जे फक्त वर्गात येऊन विषयावर बोलतात. म्हणजे जे वर्गाला शिकवतात. आणि एक शिक्षक, जे कि विद्यार्थ्यांना शिकवतात. तर आपल्याला गरज नेमकं कोणाची आहे. ज्ञान तर दोघेही देतात. मग दोघात फरक कुठे पडतो. व्याख्याता (Lecturer) हे, त्यांच्या "विषयांचा" अभ्यास करतात. तर शिक्षक विषयासोबत विद्यार्थ्यांचाही अभ्यास करतात. (म्हणजे त्यांना समजले कि नाही, त्यांच्या क्षमता कोणकोणत्या आहेत, इ. ) व्याख्याता हे वर्गात येऊन बोलतात. शिक्षक हे विद्यार्थ्यांसोबत बोलतात. आणि व्याख्याता हे पूर्ण माहिती देतात. शिक्षक हे माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत करतात. शिक्षक सर्वकाळ विद्यार्थ्यांसोबत असतात. म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाच्या स्वरूपात. व्याख्याता हे विद्यार्थ्यांची माहिती वाढवतात. शिक्षक हे विद्यार्थ्यांची क्षमता आणि कौशल्य वाढवतात. आयुष्य घडवणाऱ्या व्यक्तीमध्ये सर्वात पहिला क्रमांक शिक्षकांचाच लागतो. अशा सर्व शिक्षकांना मानावे तितके धन्यवाद कमीच आहे. सर्वांगीण प्रगती घडवून आणणाऱ्या अशा सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार.
Better than a thousand days of diligent study is one day with a great teacher. Japanese Proverb