English

IT Talk

Pragati 0 to 1

IT मधील संधी.... (2)...

नमस्कार,

Circuit Board (Hardware)
Computer Hardware म्हणजे काय याची आपणा सर्वाना थोडीशी कल्पना आलीच असेल. सर्व Information System मधील घटकांना, जे कि दिसतात त्यांना Hardware म्हणतात.
याचे वापरकर्ते तर दिवसेंसिवास झपाट्याने वाढतच आहेत. आकडेवारीनुसार वर्ष २०१५ मध्ये computer ची वापरणार्यांची संख्या १,७०,००,००,००० इतकी होती.  त्याची नवीन विक्री  २८,८७,००,००० इतकी आणि आता तर ती खूप वाढली आहे. सोबतच मोबाईल वापरकर्तेही आहेच. 
तर अशा या Digital electronics and Communication Devices ची मागणी भरमसाठ आहे.
त्यामुळे त्यांचे उत्पादन आणि त्यातील नावीन्य या आपल्याला जोरदार संधी  उपलब्ध करून देतात देतात.
Computer Hardware उत्पादन क्षेत्रात चार गोष्टी मुख्यत्वे करून चालतात.
Representation of Research 

१. Research  (संशोधन)

२. Design (आराखडा बांधणी)

३. Development

४. Testing (तपासणी)

 यापैकी कोणतेही काम करणाऱ्याला Computer Hardware Engineers असे म्हणतात.

1. Research : म्हणजे  संशोधन यामध्ये computer यंत्रणा आणि त्याचे घटक यांच्यावर सखोल अभ्यास करून नवनवीन तंत्रज्ञानाचे शोध लावले जातात. ज्यामध्ये अगोदरपेक्षा जास्त  output देण्याची क्षमता असली  पाहिजे. असे संशोधन  हे वेगवेगळ्या पातळीवर केले जाते.
हे शोध लावण्यासाठी आवश्यक पात्रता:(कोणतीही एक)
    १. Mathematician (गणितज्ञ) :  आजवर Computer मधील मोठमोठे शोध हे गणितज्ञांनीच लावले आहे.  Even संगणकाचे जनक  म्हणून ओळखले जाणारे , चार्ल्स बॅबेज हे हि एक mathematician होते.
    २. Chemist (रसायनशास्त्रज्ञ):  घटकाची योग्य संरचना ठरवण्यासाठी आणि त्यात जास्तीत जास्त दर्जा    आणण्यासाठी chemist मदत करतात.
    ३. physicist (भौतिकशास्त्रज्ञ). 
    ४. Electronics and Electrical Engineer.
    ५. Designer
हे सर्व computer hardware आणि त्याचे घटकांचे संशोधन करतात.

त्यानंतर येते ते म्हणजे
२. Design : म्हणजे ज्याचा शोध लावला त्याचा आराखडा बनवणे जो कि वापरकर्त्याला आवडेल.

३. Development : या क्षेत्रात ते Device सुनियोजित पद्धतीने तयार केले जाते.

४. Testing : यामध्ये तयार केलेले Device तपासले जाते. जर काही अडचणी असतील तर त्या सोडवल्या जातात.

अशा काही पायऱ्यांमधून Computer Hardware बनवले जाते. व
या प्रत्येकामध्ये अगणिक संधी दडलेल्या आहेत...
गरज आहे फक्त ती ओळखून त्याच्यासाठी तयारी करण्याची.

येणाऱ्या भागात आपण तेही जाणून घेऊयात सविस्तर. जसा आपला म्हणन आहे.

माहिती तर माहिती आहे , आपल्याला ज्ञान हवे आहे... 

चला तर बोलूयात,

IT चा इतिहास थोडाफार आपणाला माहित झालाच आहे. यावरून आपल्या लक्षात आलेच असेल कि, माझ्यातील बदलाला आता गती मिळाली आहे.  कालानुरूप नवनवीन संधी जन्म घेतील. IT मधील कामे म्हणजे एक जिवंत संधीच असते. कारण त्याची output क्षमता असाधारण असते. सध्या हे क्षेत्र अशाच भरपूर संधीने युक्त आहे. गरज आहे त्या समजावून घेण्याची आणि त्यासाठी स्वतःला तयार करण्याची. याची थोडक्यात यादी बनवायचीच झाली तर ती  खालीलप्रमाणे असेल .

१)  Hardware Developmentation : म्हणजे hardware तयार करणे किंवा विकसित करणे.

२) Software Developmentation : म्हणजे सॉफ्टवेअर्स तयार करणे किंवा विकसित करणे.

३) Website Designing : website तयार करणे 

४) Database Management Analysis : मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या डेटाचे व्यवस्थापन करणे.

५) Cloud Computing : Online internet वर विकसित केलेल्या platform वर काम करणे.

६) Networking : संगणकाचे नेटवर्क तयार करणे व ते manage करणे.

७) Games Developmentation :  कॉम्पुटर गेम्स तयार करणे किंवा विकसित करणे

८) Testing : विविध hardware software तपासणे.

९) IT Support विविध संस्थाना किंवा व्यक्तींना it संदर्भातल्या अडचणी सोडवण्यासाठी मदत पुरवणे.

१०) Cyber Security : संगणक यंत्रणा व त्यावरील Data हा सुरक्षित ठेवणे. आजकाल बऱ्याच मोठ्या संस्थांची हि गरज झाली आहे.

याव्यतिरिक्त संगणक हा जवळपास सगळ्याच क्षेत्रात वापरला जातो. Financial, इंजिनीरिंग, etc.

तर त्या त्या फील्ड शी निगडित अँप्लिकेशन software हे सुद्धा नोकरीचे एक माध्यम आहे. 
म्हणजे 
Engineering साठी Auto CAD, Revit, Solid Works, Catia ,Test Automation, 
Financial सेक्टर साठी Tally ERP, Oracle E Business Suit etc हि यादी तर ना संपणारी आहे. 

याव्यतिरिक्त Animation हाही मुख्य प्रवाह होत आहे. यामध्ये Autodesk Maya,Blender Cinema D,Adobe Animate इ. सॉफ्टवेअर्स चा उपयोग होतो.


विडिओ एडिटिंग साठी Adobe Premier Pro, Pinacle Studio, इ. सॉफ्टवेअर्सचा उपयोग होतो. तर हि सगळी अँप्लिकेशन जॉब देणारी एप्लिकेशनस आहे. 

Information System (माहिती यंत्रणा)... म्हणजे नेमक काय?

आज मी एका website ला विचारले, कि Information म्हणजे काय? तर तिने सांगितले कि, Information म्हणजे माहिती.

त्यानंतर पुन्हा विचारले, माहिती म्हणजे काय? तर तिने सांगितले कि, माहिती म्हणजे Information.😃

सुरुवात करण्याआधी माहिती याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात. मला थोडा कमी माहित असल्यामुळे मी विकिपीडिया ला विचारले तर अशी information मिळाली कि, Information हा एक लॅटिन भाषेतून आलेला शब्द आहे : Informare' .
Informare म्हणजे मनाला आकार देणे.

माहितीचा आधुनिक अर्थ आपण असाही घेऊ शकतो कि ज्याला अर्थ आहे ती माहिती.

माहिती हि productive (उत्पादनक्षम) असते.

अशा माहिती साठीची जी आधुनिक यंत्रणा आज सगळीकडे वापरली जाते तिला इन्फॉर्मशन सिस्टिम असे म्हणतात.

१९९५ मध्ये information सिस्टिम समजावून घेण्यासाठी Silver Et. Al.( शिक्षणाच्या विविध पद्धती आणि एकाधिक बुद्धिमत्ता) मधून दोन वेगवेगळे दृष्टिकोन मांडण्यात आले. त्यापैकी एक 
Computer Based (संगणक आधारित) रचना आहे. ज्यामध्ये पाच भागांचा समावेश आहे.

१. Hardware
२. Software
३. Data
४. Procedures
५. People
६. Feedback

ओह हे तर सहा झाले...😏😕 ...  पण पाचच मुख्य आहे.

Representation of Information System
१) Hardware, : 
हा Information सिस्टिम मधील क्रमांक एक महत्वाचा घटक आहे. जी काही दृश्य यंत्र (Visible Devices) आहेत, म्हणजे CPU (Central  Processing Unit). Mouse, Keyboard, Monitor, Printer, Modem, इ. या सर्वाना Hardware असे म्हटले जाते. हि सगळी यंत्र क्रमबद्ध पद्धतींनी इनपुट स्वीकारतात , त्यावर प्रक्रिया करून output तयार करतात.

२) Software, 
म्हणजेच Program. Program म्हणजे सूचनांचा संच. Hardware समजू शकतील अशा सूचनांचा संच म्हणजे प्रोग्रॅम. त्या सूचनांनुसार Hardware काम करतात. हा एक बहुआयामी भाग आहे. याबद्दल आपण येणाऱ्या भागात सविस्तर माहिती घेऊयात.

३) Data :
म्हणजे आकडेवारी किंवा कच्ची माहिती , किंवा वापरकर्त्याने दिलेले आदेश. या data च्या आधारावर संगणक प्रक्रिया करून माहितीचे निर्माण करतो.

४) Procedures : 
Software आणि Hardware हे बहुआयामी विभाग आहेत. त्यांचा उपयोग व त्यांना दिल्या जाणाऱ्या सूचना हि तितक्याच विभिन्न प्रकारच्या असतात. या Instructions अगदी बरोबरच दिले गेले पाहिजेत अन्यथा output  चुकीचे मिळेल या अनुषंगाने Hardware व Software वापरण्याच्या अचूक पद्धतीचे एका ठिकाणी सविस्तर वर्णन केलेले असते. त्याला Procedures असे म्हणतात काही वेळा त्याला Documentation असेही म्हणतात.

५) People : 
म्हणजे वापरकर्ता. संगणकाच्या प्रत्येक पायरीवर वापरकर्ता हा असतो. Software Hardware विकसित करण्यापासून तर ते वापरण्यापर्यंत.
त्याचे विविध फायदे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष रित्या घेणाऱ्या व्यक्तीला हि User (People) असे म्हटले जाते.

१९९५ च्या Study Model मध्ये काही नवीन गोष्टी हि समाविष्ट झाल्या आहेत आणि भविष्यात हि होत राहणार.
त्यापैकि एक महत्वाची म्हणजे


Network : 

संगणकाचे जाळे. माहिती व यंत्रणा विभागून वापरण्याची हि प्रणाली. या प्रणालीने आज अक्षरशः पूर्ण जग एका Monitor च्या स्क्रीन वर आणून ठेवले आहे. Monitor च्याच नव्हे तर mobile च्याही स्क्रीन वर सगळे जग उपलब्ध आहे. या प्रणालीमुळे आपल्याबरोबर संवाद साधने शक्य झाले आहे. सगळे जन मिळून आता या विकासाला हातभार लावत आहेत. ज्ञानाची भर घालत आहेत. 

Information Technology Live Broadcasting (थेट प्रक्षेपण).

हेलो,मी दिसतोय का व्यवस्थित, खर तर हि स्क्रीन खूप छोटी आहे कि जिच्यात मी सामावू शकेल. आणि 

हो मुझे इतना मत देखना, क्योकी मै समज मी आता हु नजर मे नही.😊😆

ओह confused. ओके माहिती हाताळणे हे माझे ध्येय आहे तेच (IT) माझे नाव. पण जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही माझी आधुनिक Information System बघू शकता व अभ्यासू शकता. ठीक आहे सविस्तर सांगतो..

ज्याप्रमाणे माणसाला एक शरीर असते आणि त्यात एक चैतन्य. त्याला काही जन आत्मा असेदेखील म्हणतात. त्याचप्रमाणे मी IT आत्मा आहे आणि Information System हे माझे शरीर. माझे ध्येय Information System च्या मदतीने पूर्ण होतात.

माझ्या ध्येयांमध्ये अगदी अत्याधुनिक काम म्हणजे Electronic Data Processing. ज्यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे

1. Data Storage 

Punched Tape
म्हणजे माहिती साठवणे याचा.  तांत्रिक दृष्ट्या यामध्ये बर्याच उलाढाली झाल्यात. सर्वात सुरुवातीला Punched Tape हे माहिती साठवण्यासाठी कॉम्पुटर मध्ये वापरले गेले. ज्यामध्ये एका पट्टीवर विशिष्ट क्रमाने holes असतात, जे Data दर्शवितात.


यानंतर IBM ने १९५६ ला त्यांच्या IBM ३०५ RAMAC (Random Access Method for Accounting and Control) या व्यावसायिक कॉम्पुटर साठी सर्वप्रथम Hard Disk (Magnetic Disk Storage) बनवली. तेव्हापासून ते आजपर्यंत जवळपास संपूर्ण मुख्य storage हे Hard Disk वरच होते.

यादरम्यान मोठ्या प्रमाणावर data साठवणे आणि तो मिळवणे आणि गती कमी होऊ न देता त्यावर प्रक्रिया करणे या सर्व अडचणी सोडवण्यासाठी  समोर आली ती म्हणजे Database Management System (DBMS).  याबद्दल आपण नंतर सविस्तर चर्चा करू, कारण हा आजच्या व येणाऱ्या काळातला मुख्य करिअरचा प्रवाह असणार आहे. Data storage नंतर क्रमांक लागतो तो म्हणजे,

2. Data Retrieval, 

म्हणजे साठवलेली माहिती मिळवणे. जे कि खूप गरजेचे आहे कारण माहिती साठवली आणि ती जर मिळालीच नाही तर मग साठवून फायदाच काय.
आपण आताच ऐकले Database बद्दल. या Database सोबत संवाद करण्यासाठी एक विशिष्ट programming language चा उपयोग केला जातो. ती म्हणजे Structured Query Language .(SQL). या SQL च्या साहाय्याने Database मधून माहिती अचूक व सुरक्षित रित्या मिळविली जाते. यानंतर चे काम म्हणजे 

3. Data Transmission 

माहितीचे वहन. यात तीन पैलू आहेत, ते म्हणजे Transmission (वहन), डेटा Propagation (माहितीची वाढ), आणि Reception (माहिती स्वीकारणे). यालाच थोडक्यात Broadcasting (प्रक्षेपण) असेही म्हटले जाते.

4. Data Manipulation

माहिती हाताळणी. यामध्ये माहिती वर प्रक्रिया करून ती वापरण्याजोगी Present (प्रदर्शित ) केली जाते.
Data व त्याच महत्व कळाल्यावर त्याच्या वापरकर्त्यांची संख्या खूप झपाट्याने वाढू लागली. 
Hilbert आणि coper यांनी तर आकलन केले कि प्रत्येक वापरकर्त्यांची प्रकीर्या करण्याजोगी माहिती हि दर १४ महिन्याला दुप्पट होत होती. इतक्या मोठ्या माहितीचे आकलन करणे आणि त्याची गती हरवू न देणे हे खुप गरजेचे झाले.  याचसाठी जगभरात वेगवेगळ्या programming पद्धतींनी, या डेटावर प्रक्रिया करण्याच्या व त्यांचे आकलन करण्याच्या सॉफ्टवेअरची निर्मिती केली.याला Data Mining असेही म्हणतात.

Data Storage, Retrieval, Transmission, Manipulation, साध्य करण्यासाठी जी यंत्रणा आहे ती म्हणजे Information सिस्टिम, म्हणजे  माझे भौतिक अंग. त्याबद्दल जाणून घेऊया पुढच्या भागात.


 (प्रगती हेच सृष्टीचे मूळ आहे आणि प्रत्येकाचे ध्येयही). 

हॅलो : आपण Information Technology बोलत आहेत का ? आम्हाला आपल्याबद्दल माहिती हवी आहे.

हॅलो, मी Information Technology बोलतोय... 
Representation of Advanced Information Technology 

माहिती साठवणे (Storage), 
प्रक्रिया करणे (Processing), 
पुन्हा मिळवणे (Retrieval), 
तिचे वाहन करणे (Transmission) हे माझे काम. 
Representation of Writing Scripts & Pages


हे काम खरंतर खूप शतकांपासून होत आहे.    म्हणजे ईसवीसन पूर्व ३००० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया (Mesopotamia), एलोमीट (elomite), या लेखनपद्धतीपासून याची सुरुवात झाली. भारतातही ३५०० हजार वर्षांपासून लेखन पद्धती अस्तित्वात आहे. ज्यास इंडस स्क्रिप्ट (Indus Script) असेदेखील म्हणतात. विकसित हडप्पा संस्कृती मध्ये याचा उगम आढळतो. 
याला नवीन कलाटणी मिळाली, ती म्हणजे ई.पु. १०० च्या आसपास. जेव्हा कागदाचा शोध चीन मध्ये त्साई लून यांनी लावला. माहितीचे योग्य जतन (Information Storage) तेव्हापासून सुरु झाले. 

Analytical Engine
अगदी आता सगळे समीकरणच बदलले ते म्हणजे इस १८३७ मध्ये चार्ल्स बॅबेज यांनी पहिला संगणक कम विश्लेषण यंत्राचा (analytical Engine) शोध लावला. ज्यामध्ये यंत्राद्वारे आकडेमोडी करणे शक्य झाले. हि माहिती हाताळण्याची अगदीच वेगळी आणि नवीन तंत्रज्ञानाची नांदी होती. 

त्यानंतर संगणक बऱ्याच प्रक्रियेतून गेल्यानंतर इ.स. १९४० नंतर संगणकाच्या विकासाला गती मिळाली.

मला Information Technology  हे नाव १९५८ मध्ये मिळाले. हार्वर्ड बीजनेस रिव्हिव्ह च्या एका लेखामध्ये लेखक हॅरोल्ड जे लियाविट आणि थॉमस एल व्हिस्लर यांनी या यंत्रणेला म्हणजे मला आतापासून Information Technology अस आपण म्हणायला हवा अस नमूद केल.

या नंतर १ डिसेंबर १९८३ ला internet  चा शोध लावला गेला. आणि पुन्हा एकदा या मला नवी उंची मिळाली. शास्त्रज्ञ टीम बर्नर ली यांनी WWW म्हणजे World Wide Web चा शोध लावला. त्यावरूनच मला आता एका नवीन नावानेहि ओळखले जाते. ते म्हणजे Information and Communication Technology (माहिती आणि संवाद तंत्रज्ञान). 
 Largest Network of Computers (Internet Representation)

अरे हो आता तर विडिओ कॉल हि शक्य आहे. तुम्ही पुढच्या वेळी मला विडिओ कॉल करा मी अजून काही माहिती सांगेल. तोपर्यंत संगणक वापरा आणि प्रगती करा......